जनतेचा बहिष्कार; तरीही यांना मतदान करतात कोण? फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याचा व्हिडीओ शेअर करत संजय राऊत यांचा महायुती सरकारवर निशाणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावर जनतेने बहिष्कार टाकला, तरीही यांना मतदान करतात कोण? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यातील सभेचे व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या समोरील खुर्च्या मोकळ्या दिसत आहेत. यावरून संजय राऊत यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.
देवेंद्र फडणवीस
आज
नाशिक:
जनतेचा बहिष्कार; तरीही यांना मतदान करतात कोण? pic.twitter.com/PNmInL4Pp6— संजय राऊत (@rautsanjay61) 28 ऑगस्ट 2026
नाशिक येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्यानिमित्त नाशिकच्या जनतेला आमंत्रित केले होते. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद! लोकांचा यांच्यावर विश्वास नाही, तरीही ईव्हीएममध्ये मते घुसवून विजय मिळवतात, असे ट्विट संजय राऊत यांनी केले आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्यावर जनतेचा बहिष्कार, तरीही यांना मतदान करतात कोण? असा सवालही संजय राऊत यांनी केला.
नाशिक येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभ मेळ्या निमित्त नाशिकच्या जनतेला आमंत्रीत केले होते,
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद!
लोकांचा विश्वास यांच्यावर नाही,
तरीही evm मध्ये मते घुसवून विजय मिळवतात! pic.twitter.com/ku18bzSMaO— संजय राऊत (@rautsanjay61) 28 ऑगस्ट 2026
Comments are closed.