जसप्रीत बुमराह-हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट समोर! जाणून घ्या सविस्तर

टीम इंडियाने (Team india) अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी आपली तयारी सुरू केली असून या मालिकेपूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धा (Asian Games) 2026 देखील होणार आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत, टीम इंडियाचे स्टार खेळाडू हार्दिक पंड्या (Hardik pandya & Jasprit Bumrah) आणि जसप्रीत बुमराह यांच्या फिटनेसबाबत चर्चा सुरू झाली आहे. याशिवाय, युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवबद्दलही (Prince Yadav) एक मोठी बातमी समोर आली आहे.

स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि सुपरस्टार वेगवान गोलंदाज बुमराह बऱ्याच काळापासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये (COE) आपल्या फिटनेसवर काम करत आहेत. हार्दिक पंड्या आयपीएल 2026 नंतर मैदानात दिसलेला नाही. तो बऱ्याच काळापासून बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये आपल्या फिटनेसवर मेहनत घेत आहे. पण सध्याच्या रिपोर्टनुसार, पंड्याचे पुनरागमन सध्या कठीण दिसत आहे.

बीसीसीआय त्याच्या बाबतीत कोणतीही घाई करू इच्छित नाही. त्यामुळे अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत पंड्या खेळण्याची शक्यता सध्या कमीच वाटत आहे.

तसेच दिग्गज खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेला जसप्रीत बुमराह देखील सध्या दुखापतीमुळे टीम इंडियाबाहेर आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याची निवड झाली होती, पण दुखापतीमुळे तो संघातून बाहेर पडला. तेव्हापासून बुमराह सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेत त्याचे पुनरागमन होणे अत्यंत कठीण दिसत आहे. तो कदाचित वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत खेळताना दिसू शकतो. युवा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादव झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-20 मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता.
आता समोर आलेल्या माहितीनुसार, तो पूर्णपणे फिट झाला आहे. अशा परिस्थितीत, अफगाणिस्तानविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेदरम्यान प्रिन्स यादव टीम इंडियाच्या संघाचा भाग असू शकतो. प्रिन्सने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत खूपच शानदार कामगिरी केली होती.

एशियन गेम्स 2026 मध्ये आता बीसीसीआय आपला ‘बी’ संघ पाठवण्याचा निर्णय घेऊ शकते. अशा स्थितीत, प्रिन्स यादव तिथे संघाच्या प्रमुख गोलंदाजाची भूमिकाही बजावू शकतो. मात्र, असे घडल्यास टीम इंडियाचे स्टार खेळाडू थेट न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळताना दिसतील, जिथे टीम इंडिया 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. ही मालिका ऑक्टोबरमध्ये खेळवली जाणार आहे.

Comments are closed.