आशियाई खेळ 2026 – नीरज चोप्रा बाहेर
स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला दुखापत झाल्याने हिंदुस्थानला मोठा धक्का बसलाय. सप्टेंबरमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नीरजला आता मैदानात उतरता येणार नाही. प्रशिक्षणादरम्यान त्याच्या टाचेला गंभीर दुखापत झाली असून, लिगामेंट फाटल्याची माहिती नीरजने शनिवारी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली.
नीरजला प्रशिक्षणादरम्यान ही दुखापत झाली. लयीत परतत असतानाच दुखापतीने नीरजच्या मोहिमेला मोठा ब्रेक लावला आहे. या दुखापतीमुळे नीरजला केवळ आशियाई क्रीडा स्पर्धेलाच मुकावे लागणार नाही, तर ब्रसेल्स येथे होणारी डायमंड लीग फायनल आणि पहिली वर्ल्ड अॅथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप यांनाही तो मुकणार आहे.
Comments are closed.