गोविंदा रे गोपाळ! रत्नागिरी जिल्ह्यात 2 हजार 578 दहीहंड्या फुटणार
गोविंदा रे गोपाळा म्हणत गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडण्याची जोरदार तयारी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५७८ दहीहंड्या फुटणार आहेत. त्यामध्ये २८५ सार्वजनिक आणि २ हजार २९३ खासगी दहीहंडींचा समावेश आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी दहीहंडी साजरी केली जाते.पारंपारिक दहीहंड्या फोडून उत्सवाला प्रारंभ होतो. तीन थरापासून नऊ थरांपर्यंत दहीहंड्या उभारल्या जातात. जिल्ह्यात होणाऱ्या दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत गोविदा पथके उत्साहाने सहभाग घेतात.
रत्नागिरी जिल्ह्यात २ हजार ५७८ दहहंड्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये दापोलीत ६१७ दहीहंड्या, मंडणगडमध्ये २६९ दहीहंड्या,खेड १८२ दहीहंड्या ,गुहागरमध्ये २२८ दहीहंड्या, चिपळूणमध्ये ४१२ दहीहंड्या, संगमेश्वरमध्ये १२८ दहीहंड्या, रत्नागिरीत १५१ दहीहंड्या, लांजा येथे ११३ दहीहंड्या आणि राजापूरात १७३ ठिकाणी दहीहंड्या फुटणार आहेत.
Comments are closed.