VIDEO: “भारत आयर्लंडकडून हरला, तर क्रिकेट थांबले होते का? मग पाकिस्तान….”; मोहसिन नकवींचा सडेतोड इशारा

पाकिस्तान क्रिकेट वरिष्ठ पुरुष संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. एकेकाळचा हा आशियाई संघ परदेशी भूमीवर चांगली कामगिरी करत होता, मात्र सध्या त्यांची स्थिची उलट आहे. पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध लागोपाठ दोन्ही कसोटी सामने मोठ्या फरकाने गमावले. त्यामुळे खेळाडू आणि संघ व्यवस्थापनावर बऱ्याच टीका होऊ लागल्या. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे प्रमुख मोहसिन नकवी बचाव करण्यासाठी पुढे झाले असता त्यांनी भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या कामगिरीचे उदाहरण दिले आहे.
इंग्लंड दौऱ्यातील पाकिस्तानची निराशाजनक कामगिरी, ज्यामुळे संघावर आजी-माजी क्रिकेटपटूंनी टीका केली आहे. पीसीबीने यावर उपाययोजन करत दौऱ्याच्या मध्यातच सात पाकिस्तानी खेळाडूंना परदेशी पाठवले. तसेच माजी कर्णधार सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांच्यानाही त्यांच्या पदावरून मुक्त केले.
पाकिस्तान क्रिकेट कठीण काळातून जात असल्याचे नकवी यांनी मान्य करत भारताचा आयर्लंडविरुद्ध आणि दक्षिण आफ्रिकेचा नामिबियाविरुद्ध पराभव यांकडे लक्ष वेधले आहे.
नकवी म्हणाले, ” मी तुम्हाला एक गोष्ट विचारतो, दक्षिण आफ्रिकेचा नामिबियाकडून आणि भारताचा आयर्लंडकडून पराभव झाला. मग तिथेही क्रिकेट संपले का? कसोटी सामन्यात जे घडले त्याला चुकीचे म्हणता येणार नाही; पण मला विश्वास आहे की, ज्याप्रमाणे आम्ही एकदिवसीय आणि टी20 सामन्यांमध्ये प्रगती केली, तशीच प्रगती आम्ही आगामी काळातही करू.”
“सलमान आगा एक उत्कृष्ठ खेळाडू आहे, मात्र काही कारणांमुळे तो लयीत नाही. आम्ही त्याच्याशी बोललो आहोत आणि सर्व काही केले आहेत. त्यामुळे कोणालाही संघातून काढणे हा आमचा उद्देश नाही,” असेही नकवी यांनी पुढे म्हटले आहे.
कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चांगली नाही होत असली, त्यामुळे संपूर्ण पाकिस्तान क्रिकेटची अधोगती होत आहे, यावर नकवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, “आम्ही दोन कसोटी सामना गमावले, पण माझा विश्वास आहे की सर्वकाही ठीक होईल. ज्याप्रकारे आम्ही टी 20 आणि वनडे सामन्यांमध्ये प्रगती केली त्याप्रमाणे कसोटीमध्येही करू.”
“मी कधीच टीकेला घाबरलो नाही आणि घाबरणारही नाही. जे लोक म्हणत आहे की मी आल्यापासून क्रिकेट उद्ध्वस्त झाले आहे, त्यांनी पाहावे की आम्ही आमची कोचिंग टीम आणण्यापूर्वी क्रमवारी काय होती. आम्ही वनडे सामन्यांमध्ये आठव्या स्थानावर होतो आणि आता पाचव्या स्थानावर आहोत. तसेच टी 20 क्रमवारीमध्येही आम्ही नवव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानी झेप घेतली,” असे नकवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
नकवी यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाकिस्तान आता इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना 9 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. (Mohsin Naqvi says South Africa lost to Namibia, India also lost to Ireland. Does that mean cricket is over VIDEO)
Comments are closed.