सावधान! हा गोड पदार्थ तुमच्या चेहऱ्यावर आणतोय सुरकुत्या





तुम्ही रोज गोड पदार्थ, चहा किंवा पॅकेज्ड ज्यूस आवडीने खाताय का? तर सावधान व्हा ! कारण नकळतपणे होणारं साखरेचं जास्त सेवन तुम्हाला वेळेआधीच म्हातारे बनवू शकते. तज्ज्ञांच्या मते प्रमाणापेक्षा जास्त साखरेचं रोजचं सेवन तुमच्या त्वचेला आणि शरीराला वेगानं वृद्धत्वाकडे  घेऊन जाऊ शकते. विज्ञानाच्या भाषेत या प्रक्रियेला ग्लायकेशन म्हणतात. रक्तातील साखरेचा थेट परिणाम त्वचेच्या कोलाजनवर होऊन चेहऱ्यावर सुरकुत्या कशा पडतात आणि साखर शरीराला आतून कशी कमकुवत करते जाणून घेऊयात सविस्तरपणे

साखरेचा परिणाम

  • रक्तातील अतिरिक्त साखर शरीरातील प्रोटीनसोबत जोडली जाते. यामुळे ॲडव्हान्स ग्लायकेशन एंड-प्रॉडक्ट्स तयार होतात. कोलाजन त्वचेला तरुण व घट्ट ठेवते, पण ग्लायकेशनमुळे हे कोलाजन कमकुवत होते आणि त्वचेवर सुरकुत्या, बारीक रेषा पडू लागतात.
  • जास्त साखरेमुळे शरीरात इंफ्लेमेशन वाढते. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि त्वचा लाल पडण्याची समस्या उद्भवते.
  • जास्त साखरेमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते आणि लगेच खालावते. यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.
  • अतिसाखरेमुळे शरीरातील पेशींच्या डीएनएला नुकसान पोहोचते, ज्यामुळे त्वचा वेगाने म्हातारी होऊ लागतात.

यावर टिप्स

  • रिफाइंड व्हाईट शुगरऐवजी गुळ, मधाचा मर्यादित वापर करावा.
  • फळांमधील नैसर्गिक साखरेला प्राधान्य द्यावे.
  • कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज्ड ज्यूस, बेकरी प्रॉडक्ट्स आणि बिस्किट्समध्ये शुगर असते, ती टाळावी.
  • हिरव्या पालेभाज्या, बेरीज, रोझमेरी, ग्रीन ट्री यांचा आहाराचा भाग बनवा, जे ग्लायकेशनचा प्रभाव कमी करतात.

हेही वाचा – Weight Loss: एक्सरसाईजशिवाय वजन कमी करण्यासाठी बदला या सवयी



Comments are closed.