हिंदुस्थान पहिल्यांदाच जपानला भिडणार; दोन्ही देशांनी केली ‘सुजुकी कप’ची घोषणा, तारीख काय?

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

जगातील बलाढ्य क्रिकेट संघांमध्ये हिंदुस्थानाचा समावेश केला जातो. क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये हिंदुस्थानचा डंका आहे. हाच डंका आता पहिल्यांदा जपानमध्ये जपानी चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे. कारण पहिल्यांदाच हिंदुस्थानचा पुरुष क्रिकेट संघ आणि जपान यांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला जाणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळांनी शुक्रवारी ‘सुजुकी कप’ खेळवण्याची अधिकृत घोषणा केली आहे.

हिंदुस्थान आणि जपान यांच्यामध्ये बहुप्रतिक्षित सामना 22 सप्टेंबर 2026 जपानमधील तोचिगी प्रांतातील साणो आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे. ‘स्पोर्ट 75’ या नवीन उपक्रमाचा एक भाग म्हणून हा सामना होत असून, दोन्ही देशांमधील क्रीडा सहकार्य वाढवणे हा यामागील मुख्य उद्देश आहे. या सामन्याद्वारे टीम इंडिया पहिल्यांदाच जपानच्या दौऱ्यावर जात असल्याने आशियाई भागात क्रिकेटचा विस्तार करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विशेष म्हणजे, या द्विपक्षीय सामन्याशिवाय दोन्ही देशांचे महिला संघ 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 18 सप्टेंबर रोजी उपांत्यपूर्व फेरीत आमनेसामने येणार आहेत. तसेच, जपानचा संघ प्राथमिक फेरी पार पाडल्यास आशियाडमध्ये पुरुष संघातही पुन्हा लढत पाहायला मिळू शकते. या क्रिकेट सामंज्यमुळे हिंदुस्थान आणि जपानमधील क्रीडा व सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत मिळणार आहे.

Comments are closed.