विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द, महासभेत महापौरांकडून घोषणा
शिवसेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचे जात प्रमाणपत्र पालघर जात पडताळणी समितीने रद्द ठरवल्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. याबाबत आज महासभेत महापौर रितू तावडे यांनी राऊत यांचे नगरसेवक पद 20 ऑगस्टपासून रद्द होत असल्याची घोषणा केली.
विशाखा राऊत यांनी दादरमधील वॉर्ड क्रमांक 191 (ओबीसी महिला राखीव) मधून निवडणूक लढवताना शिंदे गटाच्या प्रिया सरवणकर यांचा 197 मतांनी पराभव केला होता. या निकालानंतर सरवणकर यांनी राऊत यांच्या जात प्रमाणपत्राच्या वैधतेवर आक्षेप घेतला होता. दरम्यान, जात पडताळणी समितीकडे आपण जात प्रमाणपत्राबाबत सर्व आवश्यक पुरावे दिले असताना ते अवैध ठरवण्यात आल्याने हे पूर्वनियोजित कारस्थान असल्याचा आरोप विशाखा राऊत यांनी केला आहे.
Comments are closed.