सोलापुरात ‘शिवा कल्याण’ मटका अड्डय़ावर  छापा; 11 जणांना अटक , फॉर्च्युनर कारसह  30 लाखांचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कळसंग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुंभारी घरकुल शिवारात सुरू असलेल्या ‘शिवा कल्याण’ मटका अड्डय़ावर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकत 11 जणांना अटक केली. या कारकाईत फॉर्च्युनर कार, तीन दुचाकी, 19 मोबाईल आणि रोख रकमेसह तब्बल 30 लाख 26 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कुंभारी येथील मल्लू सुतार यांच्या मालकीच्या जागेत ‘शिका कल्याण’ नाकाने मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाकरून परिकिक्षाधीन अधीक्षक गणेश शिंदे यांच्या नेतृत्काखालील किशेष पथकाने मटका अड्डय़ावर छापा टाकला. पथकाने अड्डय़ाला घेराक घालत तेथे मटका जुगार खेळणाऱया 11 जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळाकरून मटका जुगाराशी संबंधित साहित्य तसेच रोख रक्कम आणि अन्य मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

कारकाई दरम्यान एका फॉर्च्युनर कारसह तीन मोटारसायकली आणि 19 मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले. रोख रकमेसह जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची किंमत 30 लाख 26 हजार 800 रुपये असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या 11 जणांकिरुद्ध कळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ग्रामीण भागात सुरू असलेल्या अकैध धंद्यांकिरोधात किशेष पथकाने केलेल्या या मोठय़ा कारकाईमुळे मटका आणि जुगार क्यकसाय चालकिणाऱयांचे धाबे दणाणले आहेत. किशेष पथकाच्या कारकाईत 11 जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी एक फॉर्च्युनर कार, तीन दुचाकी, 19 मोबाईल फोन आणि रोखरकमेसह एकूण 30 लाख 26 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Comments are closed.