बँक कर्मचाऱ्यांचा आज एकदिवसीय संप; आर्थिक व्यवहारांवर होणार परिणाम – TMarathiNews

नवी दिल्ली: देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संयुक्त व्यासपीठ असलेल्या युनायटेड फोरम ऑफ बँक यूनियन्सने (युएफबीयू) शुक्रवार, ११ सप्टेंबर रोजी देशव्यापी संप करण्याचा आपला निर्णय कायम ठेवला आहे. संप पुढे ढकलण्याबाबत सरकार आणि बँक युनियन्स यांच्यात चर्चा झाली, परंतु युनियन्सला मान्य होईल असा कोणताही निर्णय न झाल्यामुळे ११ सप्टेंबरचा संप आता निश्चित मानला जात आहे. साहजिकच संपाच्या दिवशी बँक शाखांमधील सामान्य कामकाजावर परिणाम होऊ शकतो. तथापि, डिजिटल बैंकिंग, यूपीआय आणि एटीएम यांसारख्या काही सेवा नेहमीप्रमाणे उपलब्ध राहणार आहेत.

शुक्रवारच्या संपानंतर पुढील तीन दिवसही बँका सुट्ट्यांमुळे बंद राहणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना आर्थिक व्यवहारांबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. ११ सप्टेंबरच्या संपाचा बँक शाखांच्या कामकाजावर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. रोख रक्कम जमा करणे, चेक क्लिअरन्स, केवायसी आणि कर्ज-संबंधित कामांसारख्या सेवांना विलंब होण्याची किंवा त्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.