TVK ने विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 2 उमेदवारांची घोषणा केली.

वृत्तसंस्था/चेन्नई

तामिळनाडूत होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीकरता सत्तारुढ टीव्हीकेने स्वत:च्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. पक्षाने मदुरंतकम आणि धारापुरम मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये 6 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. टीव्हीकेने ही पोटनिवडणुक सेक्युलर सोशल जस्टिस व्हिक्ट्री अलायन्सच्या अंतर्गत लढविण्याचा निर्णय घेतला आहे. मदुरंतकम मतदारसंघात टीव्हीकेने के. मरागाथम कुमारवेल यांना उमेदवारी दिली. कुमारवेल हे यापूर्वी या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. सध्या ते टीव्हीकेचे उपमहासचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. धारापुरम मतदारसंघात टीव्हीकेने माजी आमदार पी. सत्यभामा यांना उमेदवारी दिली. स्थानिक राजकीय अनुभव पाहता पक्षाने त्यांना ही संधी दिली आहे. या पोटनिवडणुकीतील टीव्हीकेची कामगिरी पक्षसंघटनेचा तळागाळातील प्रभाव आणि आगामी निवडणूक रणनीतिच्या दृष्टीकोनातून महत्त्वपूर्ण मानली जाणार आहे.

Comments are closed.