CE-20 इंजिनची यशस्वी चाचणी
इस्रोला मिळाले मोठे यश : एलव्हीएम3 ची क्षमता वाढणार
वृत्तसंस्था/बेंगळूर
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) स्वत:च्या सीई20 क्रायोजेनिक इंजिनच्या 220 केएनच्या वाढलेल्या थ्रस्टवर ‘फ्लाइट एक्सेप्टेंस हॉट टेस्ट’ यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या यशस्वी परीक्षणामुळे एलव्हीएम 3 लाँच व्हीकलची पेलोड क्षमता वाढविणे आणि गगनयान कार्यक्रम पुढे नेण्यास मदत मिळणार आहे. हे परीक्षण 9 सप्टेंबर रोजी तामिळनाडूच्या महेंद्रगिरी येथील इस्रो परिसरात (आयपीआरसी) करण्यात आले होते असे इस्रोकडून सांगण्यात आले. परीक्षणादरम्यान एलओएक्स टँक प्रेशरायजेशन मॉड्यूलची (एलटीपीएम) कामगिरी यशस्वीपणे दाखविण्यात आली. हे मॉड्यूल गगनयान मिशनच्या सी32 स्टेजसाठी निर्माण करण्यात आले आहे.
सीई20 इंजिन
सीई20 इंजिन एलव्हीएम3 लाँच व्हीकलच्या अपर क्रायोजेनिक स्टेजला पॉवर पुरविते. अंतराळ संस्था भविष्याच्या एलव्हीएम3 मिशनला प्रभावी पेलोड क्षमतेसोबत चालविण्यासाठी सीई20 इंजिनचा वापर करत 22-टन थ्रस्टयुक अपग्रेडेड सी32 स्टेजवर काम करत आहे. हे परीक्षण मार्च महिन्यात महेंद्रगिरी प्रकल्पात 22 टनाच्या थ्रस्टच्या स्तरावर करण्यात आलेल्या सीई20 इंजिनच्या समुद्रतळावर करण्यात आलेल्या हॉट टेस्टनंतर करण्यात आले आहे. हे परीक्षण नोजल प्रोटेक्शन सिस्टीम आणि मल्टी-एलिमेंट इग्नायटरचा वापर करून करण्यात आले होते.
मार्चमधील परीक्षणाचा उद्देश
मार्च महिन्यात करण्यात आलेले परीक्षण थ्रस्ट स्तरावर समुद्रतळावर परीक्षणासाठी इंजिनच्या योग्यतेचे आकलन करण्याच्या उद्देशाने करण्यात आले होते. 165 सेकंदांच्या परीक्षणादरम्यान इंजिन आणि परीक्षण सुविधेने अपेक्षेनुसार कामगिरी केली होती असे इस्रोकडून सांगण्यात आले होते.
आणखी एक पाऊल पुढे
सीई20 चा हाय-एरिया-रेशियो नोजल, स्वत:च्या कमी एक्झिट प्रेशरमुळे समुद्र-स्तरावर टेस्टिंगला अत्यंत अवघड करते. नोजलच्या आत फ्लो सेपरेशनमुळे जबरदस्त वायब्रेशन आणि थर्मल स्ट्रेस निर्माण होऊ शकते, ज्यामुळे नोजलच्या आकाराच्या मजबुतीवर प्रभाव पडू शकतो. अलिकडेच झालेल्या यशस्वी उ•ाण स्वीकृती परीक्षणामुळे आगामी एलव्हीएम 3 मिशन्ससाठी अपग्रेडेड सी32 टप्प्याला संचालनात आणण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे पडले आहे.
Comments are closed.