शेतात असलेल्या काँक्रिट प्लॅटवरून वाद; मंत्री अतुल सावे यांच्या भावासह पुतण्याला बेदम मारहाण, 6 संशयितांना ताब्यात घेतले
शेतात असलेल्या काँक्रिट प्लँटवरून नालेल्या वादात भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे बंधू अजित सावे (७०) नाणि पुतण्या अमेय सावे (३५) यांना बेदम मारहाण करण्यात आली. या करणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, अमेय सावे बांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालण्यात आल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असून प्यांच्यावर सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
पैठण तालुक्यातील नायगाव खंडेवाडी शिवारात सावे कुटुंबाची शेती असून तेथे अमेय सावे यांनी दोन वर्षांपूर्वी काँक्रिट प्लँट टाकला आहे. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अजित सावे आणि अमेय सावे हे तेथून जात असताना त्यांचा काही जणांशी वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीत दोघेही जखमी झाले. दोघांवर बिडकीन ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र अमेय सावे यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार करण्यात आल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठवण्यात आले. सिग्मा हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. अजित आणि अमेय सावे यांचे जबाब नोंदवण्यात आले. या मारहाणीचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
लोकांनी काही ऐकून घेतले नाही
अजित आणि अमेय सावे हे काँक्रिट प्लॅटकडे जात असताना काही जणांनी त्यांना, येथून गाडी नेऊ नका, असे सांगितले. त्यावरून लोकांनी वाद घालायला सुरुवात केली. अजित सावे यांनी त्यांना ‘रस्त्याचा विषय असेल तर आपण बोलू, जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊ’ असे सांगितले. ‘पाहिजे तर मोजणी करून घेऊ’ असेही ते म्हणाले. परंतु लोकांनी काही ऐकून न घेता थेट मारहाण करण्यास सुरुवात केली, असे मंत्री अतुल सावे यांनी सांगितले. अमेय समजावण्यासाठी गेला असता त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालण्यात आला. या लोकांनी अजित सावे यांच्या खिशातील पैसेही काढून घेतले, असा आरोपही अतुल सावे यांनी केला.
Comments are closed.