कोकणात घराघरात मंगलमय वातावरण! यंदा १ लाख ६९ हजार ६६४ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
गणपती बाप्पांच्या आगमनाची चाहूल लागली असून कोकणात घराघरात मंगलमय वातावरणात उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. यंदा रत्नागिरी जिल्ह्यात गणेश चतुर्थीला १ लाख ६९ हजार ५३८ घरगुती गणपती आणि १२६ सार्वजनिक गणपती अशा एकूण १,६९,६६४ गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गतवर्षी २०२५ पेक्षा यावर्षी घरगुती गणपर्तीमध्ये ११२ ने वाढ झाली असून, सार्वजनिक गणपतींमध्ये घट किंवा वाढ झालेली नसून ती गतवर्षी इतकीच आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण.घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते. कुणाच्या घरी दीड दिवसाचा, कुणाकडे पाच दिवस, गोरी गणपती पर्यंत तर काहीजणांकडे अनंत चतुर्दशीपर्यंत गणेशोत्सव साजरा केला जातो. घरच्या गणपतीसाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावी येतात.घरोघरी मंगलमय वातावरणात भक्तीभावाने गणपतीची पुजा केली जाते. गावकरी एकत्र येऊन आरती करतात. त्यानंतर अंगणात जाखडी रंगते.
घरगुती गणपती बरोबरच सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाण वाढत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात यंदा १२६ सार्वजनिक गणेशोत्सव साजरे होणार आहेत.त्यामुळे टिळक आळीतील १०१ वर्षांचा इतिहास असलेला पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव,बंदररोड मित्रमंडळाचा गणेशोत्सव,लाल गणपती, त्याचबरोबर रत्नागिरी नगर परिषद कर्मचारी मंडळ, भूमी अभिलेख, जिल्हा रूग्णालय, प्रादेशिक रूग्णालय, विशेष कारागृह, शहर पोलीस ठाणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.
Comments are closed.