अभिषेक बॅनर्जी यांना न्यायालयाने दिलासा दिला.

कार्यालय रिक्त करण्याच्या कारवाईला अंतरिम स्थगिती

वृत्तसंस्था/ कोलकाता

येथील उच्च न्यायालयाने कोलकाता येथील कॅमॅक स्ट्रीटवरील तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) कार्यालय रिक्त करण्यासंदर्भात अग्निशमन विभागाने दिलेल्या नोटीसला स्थगिती दिली आहे. अग्निसुरक्षा तपासणीदरम्यान कथित त्रुटी आढळून आल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली होती. न्यायमूर्ती कृष्ण राव यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांना 4 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या नोटीसवर कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश दिल्याने टीएमसी नेते अभिषेक बॅनर्जी यांना दिलासा मिळाला आहे. न्यायमूर्ती राव यांनी निष्कासन नोटीसला अंतरिम स्थगिती दिली आहे. याप्रकरणी 16 सप्टेंबर रोजी अंतिम निकाल अपेक्षित आहे. इमारतीचे अग्निसुरक्षा प्रमाणपत्र कालबाह्य झाले असले तरी, परिसराला कोणताही तात्काळ धोका नाही. तसेच, रहिवासी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन करण्यास तयार असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. खटल्याची सुनावणी केल्यानंतर न्यायमूर्ती राव यांनी अंतरिम स्थगिती दिली. तथापि, 16 सप्टेंबर रोजी या खटल्याची पुन्हा सुनावणी होणार आहे.

Comments are closed.