बँक संपामुळे व्यवहारांवर परिणाम होतो

सलग सुट्ट्यांमुळे ग्राहकांना फटका

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एसबीआय, पीएनबी आणि युनियन बँकेसह देशभरातील सार्वजनिक आणि काही खासगी बँका शुक्रवारपासून सलग तीन दिवस बंद राहणार आहेत. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाच दिवसांच्या कामकाजाच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स शुक्रवारी एक दिवसाचा संप पुकारल्यामुळे बँकिंग व्यवहारांवर परिणाम झाल्याचे दिसून आले. त्यापाठोपाठ आता महिन्याच्या दुसऱ्या शनिवारमुळे 12 सप्टेंबर रोजी आणि रविवारी, 13 सप्टेंबर रोजीही बँक शाखा बंद राहणार आहेत. या सलग सुट्ट्यांमुळे बँकांमधील प्रत्यक्ष कामकाज खंडित राहणार असल्याने ग्राहकांना फटका बसणार आहे. तथापि, यूपीआय, मोबाईल बँकिंग आणि एटीएम यांसारख्या डिजिटल सेवा या काळात सुरू राहणार असल्याने दिलासा मिळणार आहे.

Comments are closed.