वैभव बाहेर, सॅमसनची एन्ट्री! पहिल्या टी20 सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 निश्चित

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 13 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाईल. पहिला टी20 सामना उद्या म्हणजेच रविवारी आहे. हा सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल. अफगाणिस्तान या मालिकेचा यजमान आहे. या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये संजू सॅमसनचे पुनरागमन झाले आहे. भारताला एकट्याच्या बळावर 2026 टी20 वर्ल्ड कपचे विजेतेपद मिळवून देणाऱ्या सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणे निश्चित मानले जात आहे. अशा स्थितीत 15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी किंवा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन या दोघांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते.

​अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ओपनिंग करताना दिसू शकतात. अशा वेळी वैभव सूर्यवंशीला प्लेईंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. तीन नंबरवर इशान किशन खेळू शकतो. यानंतर चार नंबरवर कर्णधार श्रेयस अय्यर आणि पाच नंबरवर उपकर्णधार तिलक वर्मा यांचे खेळणे निश्चित आहे.

​नितीश कुमार रेड्डी या मालिकेद्वारे टीम इंडियात पुनरागमन करत आहे. त्याला थेट प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते. तो सहा नंबरवर खेळू शकतो. त्यानंतर शिवम दुबे येऊ शकतो. यामुळे सहा आणि सात नंबरवर भारताकडे दोन स्फोटक मॅच फिनिशर असतील. आठ नंबरवर स्पिन ऑलराउंडर अक्षर पटेलला संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन सुंदरला बाहेर बसावे लागू शकते. वरुण चक्रवर्ती मुख्य फिरकीपटू असू शकतो. तर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग यांच्या खांद्यावर राहू शकते. अशा प्रकारे भारताकडे गोलंदाजीचे 6 पर्याय उपलब्ध असतील.

च्याअफगाणिस्तानविरुद्ध पहिल्या टी20 साठी भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टिरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

Comments are closed.