नागालँडच्या बाजारपेठेत अजगराची अंडी उपलब्ध आहेत.

हजार रुपयांमध्ये होते विक्री, आवडीने खातात लोक

नागालँडच्या एका स्थानिक बाजारात अजगराची अंडी विकली जातात. या अंड्यांची किंमत जवळपास एक हजार रुपये प्रति डझन असते आणि स्थानिक लोक ही अंडी अत्यंत आवडीने खात असतात. ईशान्य भारतातील आदिवासी शतकांपासून जंगल अन् निसर्गावर निर्भर राहिले आहेत. तेथे उपलब्ध साधनांचा भोजनाच्या रुपात वापर करण्याची परंपरा अत्यंत जुनी आहे. प्रोटीनची कमतरतायुक्त भागात किडे आणि छोटे जीव सहजपणे उपलब्ध होतात. नागालँडमधील नागा समुदायांचा आहार अत्यंत विविधतापूर्ण आहे. श्वानाचे मांस देखील काही समुदायांमध्ये खाल्ले जाते. अजगर किंवा त्याच्यासारख्या प्रजातींचे मांस आणि अंडी देखील काही भागांमध्ये खाल्ली जातात. यामुळे शक्ती वाढते आणि काही आजारांमध्ये लाभ होतो असे स्थानिक लोकांचे मानणे आहे. परंतु भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याच्या अंतर्गत अजगरासारख्या अनेक प्रजाती संरक्षित आहेत. अजगराची शिकार किंवा व्यापार कायद्यानुसार अवैध आहे.

अजगराची अंडी एक हजार रुपये प्रतिडझन दराने विकली जातात. अजगराच्या अंडीद्वारे महाग खाद्यपदार्थ तयार केला जातो, याचमुळे हे दैनंदिन आहारात सामील नसते, खास निमित्ताला हे खाल्ले जाते. परंतु युवा पिढीमध्ये पारंपरिक आहाराबद्दल रुची कमी होतेय, तर काही लोक याला टिकविण्याचा प्रयत्न करत आहेत. रेस्टॉरंट्समध्ये नागा खाद्यपदार्थांना आधुनिक शैलीत सादर केले जात आहे. तसेच वन्यजीव संरक्षणाबद्दल जागरुकता देखील वाढत आहे. अधिकारी वेळोवेळी अवैध शिकार आणि व्यापाराच्या विरोधात कारवाई करतात.

Comments are closed.