‘गिरगावचा राजा’चे आता ऑनलाईन दर्शन
गिरगावचा राजा गणेश मंडळाने आपल्या 99व्या गणेशोत्सवासाठी श्री मंदिर ऍपसोबत भागीदारी केली आहे. या माध्यमातून प्रत्यक्ष मंडपामध्ये उपस्थित राहू न शकणारे देशभरातील भाविक 11 दिवसांच्या उत्सवादरम्यान पूजेत ऑनलाईन सहभागी होऊ शकतील, देणगी देऊ शकतील तसेच नाम संकल्प आणि सेवेत सहभागी होऊ शकतील. यंदा मंडळात 24 फूट उंच आणि 3.5 टन वजनाची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती विराजमान झाली असून ही मुंबईतील सर्वात उंच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती आहे. 1928पासूनची परंपरा असलेला गिरगावचा राजा जवळपास शतकभर मुंबईच्या गणेशोत्सवाचा अविभाज्य भाग राहिला आहे. 2026मध्ये मंडळाने 99व्या वर्षात पदार्पण केले असून 2027मध्ये ऐतिहासिक शताब्दी वर्ष साजरे करणार आहे.
Comments are closed.