धमकावून आणि फसवून अल्पवयीन मुलीवर वारंवार सामूहिक अत्याचार, रायगडमध्ये संतापजनक घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रायगडमधील म्हसळा तालुक्यात संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका 17 वर्षीय मुलीला धमकावून तिच्यावर पाच जणांनी वारंवार लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींपैकी दोन जण अल्पवयीन आहेत.

एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, पाचही आरोपी पीडितेच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी पीडितेला धमकावून आणि फसवून वारंवार अत्याचार केला. याशिवाय एप्रिल ते जून 2026 दरम्यान, घरी कुणी नसल्याचा फायदा घेत घराचे बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीनेही पीडितेवर अत्याचार केला.

याप्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(2)(ड), 376(2) आणि पोक्सो अधिनियम कलम 4,6 अन्वये आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण करत आहेत.

Comments are closed.