रेल्वेची विंडोच नसल्याने द्राविडी प्राणायाम; कसारा पश्चिमेतील प्रवाशांची तिकिटासाठी फरफट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कसारा रेल्वे स्थानकाच्या पश्चिम दिशेला प्रवाशांसाठी तिकीट काढण्याची सुविधा किंवा स्वयंचलित तिकीट विक्री यंत्र (एटीव्हीएम) उपलब्ध नसल्याने प्रवाशांची अक्षरशः फरफट होत आहे. शेकडो चाकरमानी प्रवाशांसह ज्येष्ठ नागरिक व महिला तसेच प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी पूर्वेकडील थेट प्लॅटफॉर्म क्रमांक ४ पर्यंत धाव घ्यावी लागत आहे. गर्दीच्या वेळेत होणाऱ्या या गैरसोयीमुळे प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे.

कसारा रेल्वे स्थानकाच्या पश्चिम भागात मोठ्या संख्येने प्रवासी असूनही या बाजूला तिकीट सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना तिकीट खरेदीसाठी प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर धाव घ्यावी लागते. विशेषतः गर्दीच्या वेळेत तिकीट खिडकीवर मोठी रांग लागते. त्यामुळे तिकीट काढून पुन्हा फलाट गाठेपर्यंत लोकल निघून जाण्याची वेळ अनेक प्रवाशांवर येते. या गैरसोयीचा सर्वाधिक फटका ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, महिला प्रवासी तसेच जड सामान घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.

Comments are closed.