India vs Japan: वैभव सूर्यवंशीच्या नजरा जपानविरुद्धच्या सामन्यावर! कॅप्टन श्रेयस अय्यर प्लेइंग इलेव्हनमध्ये देणार का संधी?

भारतीय क्रिकेट संघ (Indian cricket team) आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी जपानविरुद्ध एक टी-20 (T20 match between India vs Japan) आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. यासाठी श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer under captaincy) नेतृत्वाखाली टीम इंडिया जपानमध्ये पोहोचली असून या सामन्यात सर्वांचे लक्ष वैभव सूर्यवंशीवर (Vaibhav Suryavanshi) असणार आहे.
श्रेयस अय्यरने वैभवची एक मोठी इच्छा अद्याप पूर्ण केलेली नाही. त्यामुळे भारत आणि जपान यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वैभवला प्लेइंग-11 मध्ये संधी मिळते की त्याला बाहेर बसावे लागते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
वैभव सूर्यवंशीने जुलै 2026 मध्ये इंग्लंडविरुद्ध आपला पहिला टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्या दरम्यान त्याची सुरुवात फारशी चांगली झाली नाही; मात्र त्यानंतरच्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगल्या खेळी केल्या. वैभवने आतापर्यंत सहा टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. मात्र भारतात त्याला अद्याप पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याची संधी मिळालेली नाही.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दिल्लीमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू असताना त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली असती. मात्र कर्णधार श्रेयसने त्याला एकाही सामन्यात संधी दिली नाही. आता भारत आणि जपान यांच्यात एकच सामना होणार आहे. या सामन्यात श्रेयस वैभवला संघात संधी देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मात्र श्रेयससाठी हा निर्णय सोपा नसेल, कारण संजू सॅमसन (Sanju Samson & Abhishek Sharma) आणि अभिषेक शर्मा सध्या शानदार फलंदाजी करत आहेत. त्यांच्या कामगिरीच्या जोरावरच भारताने अफगाणिस्तानविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-0 ने जिंकली आहे. त्यामुळे वैभवला संघात स्थान दिल्यास कोणत्या खेळाडूला बाहेर बसवले जाईल, हेही पाहणे महत्त्वाचे ठरेल.
जपानविरुद्धचा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणार आहे. ही स्पर्धा जपानमध्येच होत असून, भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्रत्येक सामना महत्त्वाचा असेल, कारण येथे सुवर्णपदकाचा प्रश्न आहे. एका सामन्यातील पराभवामुळे पदक जिंकण्याचे स्वप्न संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे भारतीय संघाला अत्यंत सावधपणे खेळावं लागणार आहे. भारतीय महिला संघाने यापूर्वीच अंतिम फेरीत पोहोचून आपले पदक निश्चित केले आहे. आता लवकरच पुरुष संघही मैदानात उतरणार आहे. भारतीय पुरुष संघालाही सुवर्णपदकाचा दावेदार मानले जात आहे. कदाचित वैभव सूर्यवंशीला येथेही आपल्या कामगिरीची छाप पाडताना पाहायला मिळू शकते.
भारतीय संघाचा पूर्ण संघ: संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, ईशान किशन, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, यश ठाकूर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, वॉशिंग्टन सुंदर, विप्रज निगम, वैभव सूर्यवंशी.
Comments are closed.