Asian Games – कमी उंची आणि अफाट ताकद! मीराबाई चानूला सुवर्णपदकापासून लांब ठेवणारी वेटलेफ्टिर आहे तरी कोण?
Asian Games मध्ये हिंदुस्थानची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूकडून देशाला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र, 49 किलो वजनी गटात अटीतटीच्या लढतीत तीने अखेर पर्यंत कडवी झुंज दिली. रौप्य पदकावर तिला समाधान मानाव लागलं. या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावलं ते उत्तर कोरियाच्या रि सॉन्ग-गम हिने. रि सॉन्ग-गमने आपल्या बहरदार खेळाच्या जोरावर फक्त सुवर्ण पदक पटकावलं नाही तर, जागतिक विक्रमही प्रस्थापित केला.
उत्तर कोरियाच्चा रि सॉन्ग-गमची उंची 4 फूट 7 इंच इतकी आहे. मात्र, तिच्या मनगटांमध्ये असलेली ताकद भल्यभल्या खेळाडूंना पाणी पाजून गेली. तिने स्पर्धेत विक्रमी 215 किलो वजन उचलून सुवर्ण पदक जिंकलं. विशेष म्हणजे ऐशियन गेम्समध्ये रि सॉन्ग-गमच हे सलग तिसरं सुवर्ण पदक ठरलं आहे. याआधी तिने 2018च्या एशियन गेम्समध्ये आणि त्यानंतर हांगझोउ येथील स्पर्धेतही जागतिक विक्रमासह सुवर्ण पदक आपल्या नावावर केले होते.
रि सॉन्ग-गम हिची ही विजयी घोडदौड केवळ एशियन गेम्सपुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तिने 2024 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करत तिने आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग जगतात आपले वर्चस्व अधिक मजबूत केले असून, ती जागतिक स्तरावर एक दमदार खेळाडू म्हणून समोर आली आहे.
Comments are closed.