हरमनप्रीत कौरने मोडला धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड! जगातील सर्वात यशस्वी कर्णधार बनली…

मागील काही दिवसांमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने लागोपाठ दोन मोठे विजेतेपद पटकावले आहेत. याबरोबरच तिने भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा मोठा विक्रम मोडत इतिहास रचला आहे.

हरमनप्रीतने कर्णधार म्हणून एक खास विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावावर केली आहे. ती सर्वाधिक टी 20 अंतिम सामने जिंकणारी कर्णधार (पुरुष किंवा महिला) ठरली आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत सुवर्णपदकाची कामगिरी केली. हे भारतीय महिला संघाचे सलग दुसरे आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्ण पदक ठरले.

भारताचे पहिल्या टी 20 विश्वचषकात नेतृत्व करताना सर्वाधिक टी 20 अंतिम सामने जिंकण्याचा विक्रम धोनीच्या नावावर होता.

धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2016 चा आशिया चषक आणि चेन्नई सुपर किंग्जने पाच आयपीएल विजेतेपद जिंकले. यामुळे टी 20 कर्णधार म्हणून धोनीने नऊ टी 20 अंतिम सामने जिंकले. हाच विक्रम हरमनप्रीतने मोडला आहे.

हरमनप्रीतचा आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मधील अंतिम सामन्यातील विजय कर्णधार म्हणून 10 वा टी 20 सामना होता. यामुळे कर्णधार म्हणून 10 टी 20 क्रिकेटचे अंतिम सामने जिंकणारी क्रिकेटविश्वातील पहिली कर्णधार ठरली.

हरमनप्रीत आणि धोनीनंतर तिसऱ्या स्थानावर रोहित शर्मा आहे. त्याने कर्णधार म्हणून आठ टी 20 अंतिम सामने जिंकले आहेत. चौथ्या स्थानी मेग लॅनिंग आहे. तिने ही कामगिरी सात वेळा केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा 147 धावांनी विजय
20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेविरुद्ध प्रथम फलंदाजी केली. स्मृती मानधनाच्या 79 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 3 विकेट्स गमावत 216 धावसंख्येचा डोंगर रचला होता.

लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरूवात अडखळत झाली. त्यांच्या एकापाठोपाठ एक विकेट्स पडतच राहिल्या. या सामन्यात त्यांची सर्वोच्च भागीदारी पहिल्या विकेटची होती, जी 18 धावांची होती. यावरून भारताची गोलंदाजीही अधिक प्रभावी ठरली, हे दिसते. श्रीलंकेचा डाव 15.4 षटकांत 69 धावसंख्येवरच संपुष्टात आला. (Harmanpreet Kaur breaks MS Dhoni’s world record! Becomes Most T20 Finla wins Captain)

Comments are closed.