IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्धच्या मलिकेत विराट-रोहितकडे खास विक्रम रचण्याची संधी! लवकरच गाठणार हा ऐतिहासिक टप्पा

भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) दोन्ही संघात वनडे मालिकेला सुरुवात होणार असून, क्रिकेट चाहते सध्या या मालिकेची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. मालिकेतील पहिला सामना रविवारी खेळला जाणार असून, या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma & Virat Kohli) आणि विराट कोहलीही खेळताना दिसणार आहेत.

हे दोन्ही खेळाडू मैदानात उतरले की काही ना काही विक्रम होण्याची शक्यता असतेच. या मालिकेतही दोघे एका खास टप्प्याजवळ पोहोचले आहेत. त्यासाठी त्यांना आणखी काही धावा कराव्या लागतील.

शुबमन गिलच्या (Shubman gill under captaincy) नेतृत्वाखाली टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्ध 3 वनडे सामने खेळणार आहे. या मालिकेत सर्व चाहत्यांचे लक्ष विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यावर असणार आहे.

वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या नावावर आहे. सचिनने 463 सामन्यांत 18,426 धावा केल्या आहेत. तर विराट कोहली या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. विराट लवकरच वनडेमध्ये 15 हजार धावांचा टप्पा पूर्ण करू शकतो. त्याने आतापर्यंत 314 वनडे सामने खेळून 14,941 धावा केल्या आहेत. म्हणजेच 15 हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला आणखी केवळ 59 धावांची गरज आहे. हा टप्पा गाठल्यानंतर वनडेमध्ये 15 हजार धावा करणारा विराट जगातील दुसरा फलंदाज ठरेल.

रोहित शर्माबद्दल बोलायचे झाले तर, त्याने आतापर्यंत 288 वनडे सामने खेळून 11,895 धावा केल्या आहेत. 12 हजार धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला आणखी 105 धावांची गरज आहे. आतापर्यंत जगातील केवळ सहा फलंदाजांनी वनडेमध्ये 12 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे रोहित हा टप्पा गाठणारा जगातील सातवा फलंदाज होण्याच्या अगदी जवळ आहे.

भारत-वेस्ट इंडिज मालिकेत एकूण (3 odi match between IND vs WI) 3 सामने खेळले जाणार आहेत. विराट आणि रोहितने पहिल्याच सामन्यात हे विक्रम पूर्ण केले, तर ते विशेष ठरेल. त्यानंतर उर्वरित दोन सामन्यांतही दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

मालिकेतील पहिला सामना 27 सप्टेंबर रोजी, म्हणजेच रविवारी खेळला जाणार आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा आता केवळ वनडे क्रिकेट खेळतात. त्यामुळे ते जेव्हा मैदानात उतरतात, तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. यावेळीही अशाच प्रकारची परिस्थिती मैदानावर पाहायला मिळू शकते.

Comments are closed.