'इंडिया' आघाडीची बुधवारी दिल्लीत बैठक?

निवडणूक आयोग अन् एसआयआरवर चर्चा होण्याची शक्यता

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

विरोधी गटातील ‘इंडिया’ आघाडीतील पक्ष बुधवार, 30 सप्टेंबर रोजी दिल्लीत एकत्र येण्याची शक्यता आहे. या बैठकीत निवडणूक आयोगाचे कामकाज आणि एसआयआरच्या मुद्यावर चर्चा होईल. तथापि, बैठकीची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. यापूर्वी, 8 जून रोजी दिल्लीत ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत 25 पक्षांनी भाग घेतला होता. तथापि, आप आणि डीएमके या बैठकीपासून दूर राहिले होते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सुचविलेल्या प्रस्तावानुसार दर दोन महिन्यांनी एकत्र येण्याचे निश्चित झाले होते. मात्र, मागील तीन महिन्यात एकदाही ‘इंडिया’ आघाडीचे नेते एकत्र आलेले दिसत नाहीत. आता येत्या बुधवारी बैठक घेण्याचे नियोजन केले जात असून त्याबाबतही अजून स्पष्टता असलेली दिसत नाही.

Comments are closed.