संपामुळे आजपासून तीन दिवस बँका बंद आहेत.

आजपासून बँकांचे कामकाज सुऊ राहणार

नवी दिल्ली: प्रतिनिधी

सरकारी बँक कर्मचारी संघटनांनी 28 सप्टेंबर पासून नियोजित असलेला तीन दिवसांचा संप पुढे ढकलला आहे. 27 सप्टेंबर रोजी रात्री 9.30 वाजता बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँकिंग असोसिएशन (आयबीए) यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दर महिन्याला आणखी दोन शनिवार सुट्टी म्हणून जाहीर करण्यावर काही प्रमाणात एकमत झाल्याचे मानले जात आहे. यावर विचार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आश्वासन आयबीएने दिले आहे. यापूर्वी, पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी देशातील सर्व सरकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये संपाची घोषणा करण्यात आली होती.

सोमवारपासून बँकांच्या तीन दिवसांच्या संपाला प्रारंभ होणार होता. आपल्या विविध मागण्यांसाठी 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर असे सलग तीन दिवस बँक कर्मचाऱ्यांनी संप करावा, असे आवाहन बँक कर्मचारी संघटनांच्या संयुक्त मंडळाने केले होते. बँका आठवड्यात सहा दिवसांऐवजी 5 दिवस चालू ठेवाव्यात, निवृत्त बँक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनात सुधारणा करावी आणि त्याचे अपडेशन करावे, बँकांच्या सर्व निवृत्तीवेतन धारकांसाठी समान महागाई भत्ता लागू करावा, राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जुन्या निवृत्तीवेतन योजनेचाही पर्याय मोकळा असावा, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.

Comments are closed.