एसआयआर अनियमिततेची न्यायालयीन चौकशी करा; कोल्हापूर खंडपीठासमोर 22 ऑक्टोबरला सुनावणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आयोगाने घेतलेल्या काही निर्णयांबाबत तसेच एसआयआर प्रक्रियेतील कथित अनियमिततेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवर आज सोमवारी न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने तातडीने सुनावणी घेण्यास नकार देत या प्रकरणांवर 22 ऑक्टोबर रोजी सुनावणी निश्चित केली.

न्यायालयाने, ही रिट याचिका असेल तर निवडणूक आयोगाविरोधात तुमचा कोणता वैयक्तिक अधिकार आहे, असा सवाल उपस्थित केला.

Comments are closed.