बिहार विधान परिषदेच्या अध्यक्षांचा राजीनामा

वृत्तसंस्था/ पाटणा

बिहार विधान परिषदेचे अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांनी सोमवार, 28  सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते भाजपच्या कोट्यातून विधान परिषदेचे अध्यक्ष होते. आता, हे पद जेडीयूकडे जाणार असल्याची चर्चा आहे. विधान परिषदेचे पुढील अध्यक्ष जेडीयूच्या कोट्यातून असतील. अवधेश नारायण सिंह यांच्या राजीनाम्यानंतर जेडीयूकडून पुढील अध्यक्ष कोण होणार हा सर्वाधिक चर्चेचा विषय आहे. जेडीयूचे विधान परिषद सदस्य (एमएलसी) आणि विधान परिषदेचे उपसभापती रामबचन राय हे पुढील अध्यक्ष असू शकतात, असे तूर्तास मानले जात आहे. येत्या काही दिवसात नवे अध्यक्ष निवडले जाणार आहेत.

Comments are closed.