उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर शेतात उतरले.

बिजनौर

उत्तरप्रदेशच्या बिजनौर येथील एका शेतामध्ये सैन्याच्या हेलिकॉप्टरने तांत्रिक बिघाडामुळे इमर्जन्सी लँडिंग केले आहे. सुमारे 20 मिनिटांपर्यंत हेलिकॉप्टर शेतातच उभे होते. वैमानिकाने खाली उतरत हेलिकॉप्टरमधील बिघाड दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. यादरम्यान दुसरे हेलिकॉप्टर आकाशात घिरट्या घालत होते. काही वेळानंतर हेलिकॉप्टरमधील बिघाड दूर झाल्यावर ते उ•ाण करत रवाना झाले. तोपर्यंत मोठ्या संख्येत ग्रामस्थ परिसरात दाखल झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित होत आहे.

Comments are closed.