Asian Games 2026 – तीरंदाजीत ‘सुवर्ण’वेध! चीनचे आव्हान मोडून काढत हिंदुस्थानी महिला संघाची विश्वविक्रमाची बरोबरी
जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानची पदकांची लयलूट सुरूच आहे. बुधवारी हिंदुस्थानच्या महिला तीरंदाज संघाने कंपाऊंड प्रकारामध्ये सुवर्णपदक जिंकले. अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या महिला संघाने चीनचा 238-234 असा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले. या विजयासह हिंदुस्थानच्या महिला संघाने जागतिक विक्रमाचीही बरोबरी करण्याचा पराक्रम केला आहे.
ज्योति सुरेखा वेन्नम, चिकिथा तानीपार्थी आणि पृथिका प्रदिप या हिंदुस्थानी त्रिकुटाने अंतिम फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवले. 240 पैकी 238 गुणांची कमाई करत हिंदुस्थानी संघाने 2014 च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत दक्षिण कोरियाने केलेल्या जागतिक विक्रमाशी बरोबरी साधली.
भारतीय महिला कंपाऊंड तिरंदाजी संघाने 2026 आशियाई क्रीडा स्पर्धेत अंतिम फेरीत चीनचा 238-234 असा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे. संघाने ही कामगिरी करत विश्वविक्रमाची बरोबरी केली. pic.twitter.com/nwaHTmI1Cf
— ANI (@ANI) 30 सप्टेंबर 2026
Comments are closed.