Asian Games: भारताला 7 वे 'गोल्ड'! महिला तिरंदाजीच्या फायनलमध्ये भारताची रेकॉर्डसह चीनवर मात, सुवर्णपदक कायम
आयची-नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने आपले सातवे सुवर्णपदक जिंकले आहे. बुधवारी (30 सप्टेंबर) भारतीय महिला संघाने कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात आपले मागील स्पर्धेतील विजेतेपद कायम राखले आहे. त्यांनी अंतिम सामन्यात चीनचा 238-234 असा पराभव करत पुन्हा एकदा सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.
भारताच्या या विजयी संघात ज्योती सुरेखा वेन्नम, प्रिथिका प्रदीप आणि चिकिता तनिपार्थी यांचा समावेश होता. भारताने 2023 च्या आशियाई स्पर्धेतील आपले सुवर्णपदक कायम राखण्यासोबतच 2014 मध्ये दक्षिण कोरियाने केलेल्या जागतिक आणि आशियाई विक्रमाचीही बरोबरी केली आहे.
उपांत्य फेरीत भारताने दक्षिण कोरियावर 234-233 असा निसटता विजय मिळवला होता, जो या दिवसाच्या सुरूवातीला झाला. या सामन्याच्या दुसऱ्या हाफमध्ये दक्षिण कोरियाने 175-175 अशी बरोबरी केली होती. या स्थितीत भारताने पहिले तर एका गुणाने आघाडी घेतली, त्यानंतर चिकिता आणि प्रिथिका यांनी दोन 10 गुणांच्या आणि ज्योतीच्या एका 9 गुणांच्या जोरावर भारताने एका गुणाने विजय निश्चित केला.
अंतिम सामन्यात भारताचे सुरूवातीपासूनच वर्चस्व होते. पहिल्या सेटमध्ये भारताने अचूक 60 गुण मिळवले, तर चीनला केवळ 58 गुण मिळवता आले. त्यानंतर शेवटपर्यंत भारताने आघाडी कायम ठेवली. ज्योती, चिकिता आणि प्रिथिका यांनी आपल्या 24 पैकी 22 शॉट्समध्ये 10 गुण मिळवले.
दुसऱ्या सेटमध्येही भारत 59-58 असा आघाडीवर राहिला, जी तिसऱ्या सेटमध्ये उपयोगी आली. तिसऱ्या सेटमध्ये चीनने अचूक 60, तर भारताने 59 गुण मिळवले. सामना 178-176 असा भारताच्या बाजूने असताना भारतीय तिरंदाजांना पुढील चुका टाळण्याचे आव्हान होते, जे त्यांनी उत्तमरित्या पेलले. अंतिम सेटमध्ये भारताने अचूक 60 गुण मिळवले आणि सुवर्णपदक पटकावले. (Jyothi Vennam, Chikitha Taniparthi Prithika Pradeep women’s compound archery India won gold at Asian Games 2026)
Comments are closed.