नेटफ्लिक्सवर पुन्हा रंगणार ‘लॉक अप’चा थरार, तर जेलर म्हणून यांची होणार दमदार वापसी – Tezzbuzz

लॉक अप हा एक लोकप्रिय रियालीटी शो आहे. आणि नुकतच लॅाक अप 2ची घोषणा  नेटफ्लिक्सवर करण्यात आली आहे. तर फिक्की फ्रेम्स 2026 या कार्यक्रमाच्या दरम्यान लाॅकअप 2चे सुत्रसंचालक फराह आणि रितेश हे देखील उपस्थित होते. तर या दरम्यान फराह खानने या रियालीटी शो होस्ट करण्याच्या आणि तेव्हाच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. लाॅकअपची निर्मीतीकार एकता कपुरने सांगितले की, या रियालीटी शोचा पहिला सीझन आमच्या अपेक्षांपेक्षा उत्तम ठरला. आणि त्यांनी पुढे म्हणले का आगामी लाॅकअप 2 च्या सीझन मध्ये नवीन कथा, कलाकार आणि अनेक धक्के मिळतील असे सांगितले.

बालाजी टेलीफिल्म्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि ‘लॉक अप’च्या निर्मात्या एकता कपूर यांनी सांगितले की, लाॅकअपच्या पहिल्या सीझनला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. आणि प्रेक्षकांना या काय आवडते हे समजले आणि आमच्या अपेक्षेपेक्षा हा पहिला सीझन यशस्वी ठरला आहे. असे त्या यावेळी म्हणाल्या.

‘लॉक अप: सच और सजा’चा दुसरा सीझन नेटफ्लिक्सवर येत आहे. होस्ट रितेश (ritesh)देशमुखने त्याच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ‘लॉक अप:सच और सजा 2’ लवकरच येत असल्याची घोषणा केली. तसेच एकता कपुरने उघड केले की, लाॅकअप 2 चे होस्ट परतणार आहेत. म्हणजेच फराह खान आणि रितेश देशमुख ‘ या शोचे जेलर जोडी म्हणुन पुन्हा प्रेक्षकांसमोर येतील. आणि आजुन तरी या शोची तारीख जाहीर झाली नसली तरी हा शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार अशी आशा आहे.

हेही वाचा

आयुष्मान खुरानाला समय रैनाने केलं ट्रोल, त्याच्या या चित्रपटावर विनोद करत म्हणाला- ‘रिफंड हवाय’

Comments are closed.