नवरात्रीआधी घराचा मेकओव्हर; कमी बजेटमध्ये घराला द्या रॉयल लूक
नवरात्रीचा सण जवळ आला की घराची साफसफाई आणि सजावटीची लगबग सुरू होते. देवीच्या स्वागतासाठी घर सुंदर आणि प्रसन्न दिसावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. मात्र घर सजवण्यासाठी मोठा खर्च करण्याची गरज नाही. घरातील काही वस्तूंचा कल्पक वापर, लाईटिंग आणि नवरात्रीच्या रंगांची योग्य निवड केल्यास कमी बजेटमध्येही घराला आकर्षक आणि रॉयल लूक देता येतो.
अनावश्यक वस्तू
मेकओव्हरची सुरुवात साफसफाईपासून करावी. घरात अनेक दिवस न वापरलेल्या वस्तू, जुने कागद, खराब वस्तू किंवा अनावश्यक सामान असेल तर ते बाजूला काढावे. घरातील जागा मोकळी दिसली की घर मोठे आणि नीटनेटके वाटते.
कुशन कव्हर, पडदे
सोफ्यावरील कुशन कव्हर, बेडशीट किंवा पडदे बदलल्याने खोलीचा लूक बदलतो. नवरात्रीसाठी तुम्ही सोनेरी, लाल, हिरवा, मरून किंवा मातीच्या रंगातील कापड वापरल्यास घराला नवा लूक मिळेल.
प्रकाशयोजना
छोटे लॅम्प, फेरी लाइट्स किंवा मातीचे दिवे लावता येतील. बाल्कनी, खिडकी किंवा टीव्ही युनिटजवळ लाइट्स लावल्यास घर अधिक सुंदर दिसते.
छोट्या सजावटीच्या वस्तू
आरसा, छोट्या मूर्ती, ट्रे यासारख्या वस्तू वापरून सजावट करता येते. दाराजवळ छोटी रांगोळी आणि दिवे लावल्यास घराचा लूक आणखी खुलेल.
फर्निचर
नवीन सोफा किंवा टेबल घेण्याऐवजी घरातील फर्निचरची जागा बदलून पाहू शकता.
हेही वाचा – साडीला फॉल लावणे का गरजेचे? कधीपासून सुरू झाली ही पद्धत?
Comments are closed.