IND vs PAK: अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानच्या या 3 खेळाडूंपासून राहावं लागणार सावध! पलटवू शकतात सामना
टीम इंडिया आणि पाकिस्तान (Team india vs Pakistan) यांच्यात क्रिकेटचा सामना असला आणि त्यात रोमांच नसेल, असे होऊच शकत नाही. आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 (Asian Games 2026) च्या अंतिम सामन्यात दोन्ही संघ पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
पाकिस्तानने उपांत्य फेरीत बांगलादेशचा 6 विकेट्सने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता भारतासमोर पाकिस्तानचे असे काही खेळाडू असतील, जे आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर सामन्याचा निकाल बदलण्याची ताकद ठेवतात. यामध्ये माज सदाकत, साहिबजादा फरहान आणि सुफियान मुकीम यांच्यावर विशेष लक्ष असेल.
माज सदाकत हा पाकिस्तानचा आक्रमक सलामीवीर फलंदाज आहे. तो वेगाने धावा करण्यासोबतच गरज पडल्यास गोलंदाजीही करू शकतो. CPL 2026 मध्ये त्याने शानदार कामगिरी केली होती. माजने 7 सामन्यांत 363 धावा केल्या आणि 2 शतके झळकावली. स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याने 114 धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना सुरुवातीलाच त्याला रोखण्याचा प्रयत्न करावा लागेल.
साहिबजादा फरहान (Sahibjada Farhan) हा पाकिस्तानचा कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज आहे. भारताविरुद्ध त्याची कामगिरी यापूर्वीही पाहायला मिळाली आहे. आशिया कप 2025 (Asia Cup 2026) मधील सामन्यात त्याने भारताविरुद्ध 58 धावा केल्या होत्या. या खेळीदरम्यान त्याने जसप्रीत बुमराहविरुद्धही षटकार लगावले होते. आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यातही फरहानने भारताविरुद्ध 57 धावा केल्या होत्या. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याची विकेट भारतासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नव्हती. 112 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानने 53 धावांपर्यंत 4 विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर अब्दुल समद आणि हसन नवाज यांनी डाव सावरला. दोघांनी नाबाद 59 धावांची भागीदारी करत पाकिस्तानला 11.3 षटकांत 6 विकेट्सने विजय मिळवून दिला. समदने 15 चेंडूंमध्ये नाबाद 30 धावा केल्या, तर हसन नवाज 22 चेंडूंमध्ये नाबाद 27 धावांवर राहिला.
सुफियान मुकीम (Sufiyaan Mukim) हा पाकिस्तानचा डावखुरा रिस्ट स्पिनर आहे. त्याच्यात विकेट घेण्याची क्षमता आहे. बांगलादेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात त्याने 3 षटकांत 26 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारतीय फलंदाजांना त्याच्या फिरकीचा सामना करताना सावधपणे खेळावे लागेल. अंतिम सामन्यात या तिन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष असेल.
Comments are closed.