रवींद्र चव्हाण मंचेकर टोळीचे ऑपरेटर; शिंदे गटाचा आरोप

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून भाजप आणि शिंदे गटातील वाद टोकाला गेला आहे. भाजपने शिंदे गटासोबतची पालिकेतील युती तोडल्याची घोषणा केल्यानंतर शिंदे गटाने लगेचच पत्रकार परिषद घेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर सनसनाटी आरोप केला. रवींद्र चव्हाण हे कुप्रसिद्ध मंचेकर टोळीचे ऑपरेटर आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना तातडीने प्रदेशाध्यक्षपदावरून हटवावे, अशी मागणी महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी केल्याने उल्हासनगरच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपने शिंदे गटासोबतची युती तोडण्याची घोषणा करत खासदार श्रीकांत शिंदे यांचे काम न करण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर शिंदे गटाने थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार कुमार आयलानी यांना टार्गेट करत आपला राग व्यक्त केला. यावेळी भाजपवर टीका करताना कमलेश निकम यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. भाजपने शिवसेनेच्या नगरसेवकांवर गुन्हेगारीचे खोटे आरोप करण्यापूर्वी आपल्याच पदाधिकाऱ्यांची पार्श्वभूमी तपासावी असे खडे बोल सुनावले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचे मंचेकर टोळीशी कनेक्शन असल्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हाकला, अशी त्यांनी मागणी केली.

उल्हास नदीकाठी अँटालिया

कमलेश निकम यांनी यावेळी भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या अनधिकृत कामाचा पंचनामा केला. आयलानी हे उल्हास नदीकाठी असलेल्या अँटालिया येथे काही धनदांडग्या बिल्डरांच्या हितासाठी बेकायदेशीर पर्यटन स्थळ उभारण्याचा घाट घालत आहेत, असा आरोप निकम यांनी केला

Comments are closed.