चिमुरडीवर अत्याचार; नराधमाला वीस वर्षे कारावास

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

घराबाहेर खेळत असलेल्या दहा वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या रवी तुम्मा या नराधमाला भिवंडी न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. भिवंडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. कारंडे यांनी नराधमाला दोषी ठरवले. हा प्रकार २०२३ मध्ये घडला होता.

पीडित चिमुकली घराबाहेर खेळत असताना आरोपी रवी तुम्मा याने चिमुकलीचा हात पकडून तिला खोलीत नेले आणि अत्याचार केला. कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. हा खटला भिवंडी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. के. कारंडे यांच्या न्यायालयासमोर आल्यावर सरकारी वकील सी. बी. नवले, विजय मुंढे यांनी सादर केलेली साक्ष आणि पुरावे ग्राह्य मानून आरोपी रवी तुम्माला दोषी ठरवण्यात आले. तसेच २० वर्षे सश्रम कारावास, पाच हजाराचा दंड अशी शिक्षा सुनावली.

Comments are closed.