14 वर्षांच्या मुलाच्या मानेत सुईसारख्या वस्तूने टोचले
घाटकोपर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भटवाडी येथे एका शाळेच्या परिसरात चुलत भावासोबत खेळायला गेलेल्या 14 वर्षांच्या मुलाला 3 ते 4 अज्ञात मुलांनी मारहाण केली. पण त्याच वेळी एका मुलाने मागून येऊन मानेत सुईसारख्या वस्तूने टोचून दुखापत केली. दरम्यान, ते नशेचे इंजेक्शन टोचल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून अधिक तपास सुरू करण्यात आला आहे. भटवाडी परिसरात राहणारा पीडित मुलगा विद्यार्थी आहे. सोमवारी संध्याकाळी तो चुलत भावासोबत भटवाडी शाळा नं. 3 येथे खेळायला गेला होता.
Comments are closed.