तहव्वूर राणा प्रकरणाची सुनावणी १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे.
सध्या तिहार तुरुंगात बंदिस्त : मुंबई हल्ल्याच्या सूत्रधाराचे 2025 मध्ये अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाच्या खटल्यातील आरोपांवरील युक्तिवादासाठी दिल्लीतील विशेष एनआयए न्यायालयाने 16 नोव्हेंबर ही तारीख निश्चित केली आहे. विशेष एनआयए न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी नुकतीच या प्रकरणाची सुनावणी केली. राणाच्या अटकेनंतर दाखल केलेले पुरवणी आरोपपत्र आणि एनआयएच्या पूर्वीच्या आरोपपत्राशी संबंधित कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला. राणा सध्या तिहार तुरुंगात कडक सुरक्षा व्यवस्थेत बंदिस्त आहे. 10 एप्रिल 2025 रोजी राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले होते. तहव्वूर राणाला ऑक्टोबर 2009 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथे एफबीआयने अटक केली होती. त्याच्यावर 26/11 मुंबई आणि कोपनहेगन दहशतवादी हल्ल्यांसाठी मदत पुरवल्याचा आरोप होता. मुंबई हल्ल्याचा सूत्रधार डेव्हिड हेडलीच्या साक्षीच्या आधारे तहव्वूर राणाला 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे
Comments are closed.