क्रीडा संघटनेचा शिलेदार काळाच्या पडद्याआड! क्रीडा संघटक कपिल साळुंखे यांचे निधन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

कुस्ती-कबड्डीच्या संघटनात्मक कार्यात योगदान देणारे आणि लालबाग-गिरणगाव परिसरात सामाजिक कार्याचा ठसा उमटवणारे क्रीडा कार्यकर्ते कपिल साळुंखे (47) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. कपिल यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, काका आणि बहिणी असा परिवार आहे.

क्रीडा क्षेत्राशी साळुंखे कुटुंबाचे अनेक वर्षांचे नाते आहे. कपिल यांचे काका संपत साळुंखे हे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त नामवंत कुस्तीगीर आणि कुस्ती संघटक आहेत. त्यांच्या भगिनी स्नेहल साळुंखे या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू असून राज्य सरकारच्या क्रीडा विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. दुसऱया भगिनी सुजाता साळुंखे या राष्ट्रीय कबड्डीपटू आणि प्रशिक्षक आहेत.

या क्रीडा वारशाचा भाग असलेल्या कपिल यांनी कुस्ती आणि कबड्डीच्या संघटनात्मक कार्यात मोलाचे योगदान दिले. क्रीडा क्षेत्राबरोबरच लालबाग आणि गिरणगाव परिसरातील सामाजिक कार्यातही ते सक्रिय होते. शारीरिक विकारांवरील उपचारांचे अभ्यासक म्हणून त्यांनी आयुर्वेदिक औषधे आणि मसाजच्या माध्यमातून खेळाडूंसह गरजूंना मदत केली.

Comments are closed.