आंदोलकांना सरसकट दिलासा देण्यास नकार, काही चुकीचे घडू दिले जाणार नाही; न्यायालयाची ग्वाही

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

एसआयआरच्या गोंधळाविरोधात मुंबईत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाने आज दखल घेतली. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सुनावणीशिवाय सरसकट दिलासा देता येणार नाही, मात्र चुकीचे काही खपवूनही घेणार नाही, असे मुख्य न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांनी स्पष्ट केले.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश पुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्यात आले. आंदोलनांदरम्यान पोलिसांनी नागरिकांना ताब्यात घेतल्याचा आरोप करत अॅड. सागर देवरे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज मंगळवारी मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी व न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. मनीष तोमर यांनी युक्तिवाद करताना न्यायालयाला सांगितले की, कोणताही प्रतिबंधात्मक आदेश नसताना पोलीस कारवाई करीत आहेत. न्यायालयाने याची दखल घेत पुढील सुनावणी सोमवारपर्यंत तहपूब केली.

Comments are closed.