नरेंद्र मोदी सर्वात मोठे विदेशी टूलकिट, अमेरिका- इस्त्रायसारखे देश त्यांना ऑपरेट करतात; संजय राऊत यांची टीका

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली. ”नरेंद्र मोदी सर्वात मोठे विदेशी टूलकिट आहेत, अमेरिका- इस्त्रायसारखे देश त्यांना ऑपरेट करतात”, अशा शब्दात संजय राऊत यांनी मोदी-शहावर घणाघाती टीका केली.

”राहुल गांधी नाही तर नरेंद्र मोदी हे देशातील सर्वात मोठे विदेशी टूलकिट आहेत. त्यांच्या 12 वर्षातली 6 वर्ष ते विश्वभ्रमन करत होते. ते कधी कधी हिंदुस्थानात येतात. नरेंद्र मोदींना ऑपरेट करणारे लोक अमेरिका इस्रायल सारख्या देशांमधले आहेत. राहुल गांधी या देशातील मातीचे सुपुत्र आहेत. या देशातील जनतेला त्यांचा स्वाभिमान मिळवून देण्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे विदेशी टूलकिट हा शब्द मोदींवर योग्यरित्या बसतोय”, असे संजय राऊत म्हणाले.

”पूर्ण जगभरात मोदींजींविरोधात, ज्ञानेश कुमार, अमित शहांविरोधात आग लागणार आहे, त्यांचा संपूर्ण चेहरा विद्रुप होणार आहे. त्यांचा मुखवटा उतरला आहे. आता विदेशात जाताना त्यांना मोदी मोदी करण्यासाठी भाड्याने लोकं न्यावी लागणार आहेत. लोकशाहीच्या मारेकऱ्याला जगात कधीच सन्मान मिळत नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

”बेकायदेशीर पद्धतीने ज्ञानेश कुमारच्या सहयोगाने सत्तेवर आलेले हे एक तानाशाही सरकार राज्यात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी आणि सत्ता उलथवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असू तर हे देशहिताचे काम आहे. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी असे आम्ही सर्व मिळून सत्ता उलथवून टाकणार आहोत. ज्या देशात तिरंगा फडकवायला बंदी आणते ती सत्ता तर उलथवून टाकायलाच हवी. हे जे मोदी आहेत ते ब्रिटीशांचे टूलकिट आहेत. सत्ता बदलणार म्हणजे बदलणारच”, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.