ICC T20 World Cup 2027 चे वेळापत्रक जाहीर, हिंदुस्थान-पाकिस्तान सामना होणार नाही; वाचा…
ICC Women’s U19 T20 World Cup 2027 चे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीचा धुरळा 21 जानेवारीला उडणार असून 6 फेब्रुवारीपर्यंत स्पर्धा खेळली जाणार आहे. बांगलादेश आणि नेपाळ यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणाऱ्या या स्पर्धेत सर्वांच्याच नजरा गतविजेत्या हिंदुस्थानवर असणार आहेत. स्पर्धेत हिंदुस्थान आणि पाकिस्तान सामन्याचा थरार चाहत्यांना अनुभवता येणार नाही.
स्पर्धेच विजेतेपद पटकावण्यासाठी 16 संघ एकमेकांना भिडताना दिसतील. चार गटांमध्ये संघांची विभागणी करण्यात आली असून हिंदुस्थानचा समावेश ‘अ’ गटात करण्यात आला आहे. ‘अ’ गटामध्ये हिंदुस्थानव्यतिरिक्त आयर्लंड, वेस्ट इंडिज, आणि नेपाळचा समावेश आहे. तर ‘ब’ गटात पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि सामोआ या देशांचा समावेश आहे. क’ गटात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, नायजेरिया आणि यूएई, तर ‘ड’ गटात इंग्लंड, श्रीलंका, अमेरिका आणि स्कॉटलंड हे संघ खेळणार आहेत. 21 जानेवारीला स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी चार सामने खेळवले जातील. टीम इंडिया आपले विजेतेपद राखण्यासाठी मैदानात उतरणार असून, त्यांचा पहिला सामना 22 जानेवारीला वेस्ट इंडिजविरुद्ध होईल.
Comments are closed.