बांधकामस्थळी धूळ रोखण्याची जबाबदारी विकासकाची; महापालिकेचा कठोर कारवाईचा इशारा
बांधकामस्थळी किंवा त्यालगतच्या रस्त्यावरील धुळीला रोखण्याची जबाबदारी संबंधित विकासक व बांधकाम व्यावसायिकांची आहे. या कामात हयगय केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.
फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि दुष्परिणामांच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. तसेच मुंबईतील वायू गुणवत्ता सुधारण्यासाठा प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले. फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि आरोग्यावर होणारे दुष्परिणाम याबाबत न्यायालयाने दिलेले निर्देश तसेच वायू गुणवत्ता सुधारणेसाठी उपाययोजनांबाबत मंगळवारी आढावा बैठक पार पडली.
वायू गुणवत्ता मापन यंत्रणा व सेन्सर बंद असल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबईतील वायू गुणवत्ता मापन पेंद्रे, सेन्सर तसेच संबंधित यंत्रणा नियमितपणे कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.
सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी
सार्वजनिक रस्ते, गल्ल्या आणि पदपथांवर फटाके पह्डण्यास मुंबई उच्च न्यायालयाने बंदी केली आहे. तसेच, शाळा, रुग्णालये, शासकीय कार्यालये, न्यायालये आदी शांतता क्षेत्रातही फटाके पह्डण्यास प्रतिबंध लावले आहेत. फटाक्यांच्या बाबतीत न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे सर्व प्रशासकीय विभागस्तरावर काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्व शासकीय आणि खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी उपक्रम राबवावेत. प्रदूषण करणारे फटाके पह्डण्याऐवजी हरित फटाक्यांचा वापर करावा, अशा सूचना महापालिका प्रशासनाने केल्या आहेत.
Comments are closed.