गुजरातची दोन माणसे महाराष्ट्र चालवत आहेत, कर्जतमधील झाडांच्या कत्तलीवरून राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

गुजरातची दोन माणसं महाराष्ट्र चालवत आहेत, असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. टोरंट पॉवर प्रकल्पाच्या नावाखाली कर्जत-भीमाशंकरच्या जंगलातील अडीच लाख झाडांची कत्तल केली जाणार आहे. या वृक्षतोडीला राज्यभरातून विरोध होत आहे. यातच आज राज ठाकरे यांनी या परिसरात भेट देऊन पाहणी केली आणि त्यानंतर आयोजित सभेत बोलताना त्यांनी राज्य सरकारवर ही टीका केली आहे.

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणले आहेत की, “सह्याद्रीच्या कुशीत २३ प्रकल्प येणार आहेत. भीमाशंकरमधील जंगलतोडीसाठी कोणतेच कंत्राट काढण्यात आले नाही. गुजरातसाठी महाराष्ट्रात जंगलतोड केली जातेय. तोडलेली झाडं पाहून वाईट वाटलं. जंगलाच्या अंत्यसंस्कारासाठी आलोय असं वाटलं.” ते म्हणाले की, “सरकार हे जनतेच्या भावना समजून घेत नाही. कारण महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या हातात काहीच नाही आहे. गुजरातची दोन माणसं महाराष्ट्र चालवत आहेत.”

राज ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या लोकांच्या हातात काहीच उरलेले नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, केंद्राने आणि एका खाजगी कंपनीने प्रकल्पाबाबत ठरवलं आणि तो प्रस्ताव त्यांना दिला. उद्योगपती थेट दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भेटतात आणि प्रकल्पासाठी हवी असलेली जमीन किंवा जंगलांची माहिती देऊन मंजुरी घेतात.”

Comments are closed.