क्रीडानगरीतून – पंकज अडवाणीचे 29 वे विश्वविजेतेपद
हिंदुस्थानी क्यू स्पोर्ट्सचा दिग्गज पंकज अडवाणीने जागतिक बिलियर्ड्समध्ये आणखी एक ऐतिहासिक यश मिळवले. बार्ंमगहॅम येथे झालेल्या डब्ल्यूबीएल जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद मिळवत त्याने कारकीर्दीतील 29 वे जागतिक विजेतेपद पटकावले.
कलकलची विजयी मालिका खंडित
जागतिक कुस्ती स्पर्धेच्या 65 किलो वजनी गटात सुजीत कलकलची सलग 24 विजयांची मालिका संपुष्टात आली. ताजिकिस्तानच्या अब्दुलमजीद कुडियेव्हने त्याला 3-3 अशा बरोबरीनंतर गुणांच्या निकषावर पराभूत केले. विशेष म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत सुजीतने याच प्रतिस्पर्ध्यावर मात केली होती. सुजीतने स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या निनो ल्यूटर्टवर 12-1 असा तांत्रिक वर्चस्वाने विजय मिळवला, तर बेलारूसच्या इस्लाम गुसेनोव्हला 4-0 असे नमवले. त्यामुळे उपांत्यपूर्व फेरीतही त्याच्याकडून मोठय़ा अपेक्षा होत्या.
सिंधूची विजयी सलामी
जागतिक बॅडमिंटनमध्ये आपले स्थान पुन्हा भक्कम करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पी. व्ही. सिंधूने हायलो ओपन 2026 मध्ये गुरुवारी प्रभावी सुरुवात केली. तिने संयुक्त अरब अमिरातीच्या प्रकृती भरथचा 21-10, 21-10 असा सरळ दोन गेममध्ये पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.तसेच स्पर्धेच्या पहिल्या फेरीत मालविका बन्सोड, उन्नती हुडा, ईशाराणी बरुआ आणि अनमोल खरब यांनी पुढील फेरीत प्रवेश केला.
Comments are closed.