भारतीय संघात 8 नवीन खेळाडूंची एन्ट्री, 4 नोव्हेंबरला न्यूझीलंडविरुद्ध सामना

भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंड दौऱ्यावर पाच सामन्यांची टी-२० मालिका 3-2 ने आपल्या नावावर केली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२० मालिकेवर कब्जा केला. आता टीम इंडियाचे पुढील मिशन एकदिवसीय मालिका असेल. 4 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल. टी-२० संघाची तुलना केल्यास एकदिवसीय मालिकेत 8 नवीन खेळाडू दिसतील.

​टी-20 मालिकेत ॲक्शनमध्ये दिसलेले वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, अभिषेक शर्मा, शिवम दुबे, संजू सॅमसन, प्रिन्स यादव, मयंक यादव, भुवनेश्वर कुमार आणि वरुण चक्रवर्ती एकदिवसीय मालिकेत ॲक्शनमध्ये दिसणार नाहीत. आता शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली विराट कोहली, रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, अंशुल कंबोज, के.एल. राहुल, गुरनूर ब्रार आणि मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा सामना करतील.

​पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने तीन संघांची घोषणा केली आहे. पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी वेगळा संघ आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी वेगळा संघ आहे. तर चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यासाठी वेगळा संघ आहे. पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये शुभमन गिल कर्णधारपद भूषवेल. तर चौथ्या आणि पाचव्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यर संघाचे नेतृत्व करेल.

Comments are closed.