ACC Rising Stars Asia Cup 2026 – तिलक वर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची घोषणा, वैभव सुर्यवंशीचाही समावेश

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

ACC Rising Stars Asia Cup 2026 ही बहुप्रतिक्षित टी20 स्पर्धा 19 ते 29 नोव्हेंबर दरम्यान कतारची राजधानी दोहा येथे खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेसाठी BCC ने 15 संदस्यीय इंडिया-ए संघाची घोषणा केली असून तिलक वर्माकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली असून उपकर्णधारपद रजत पाटीदारकडे सोपवण्यात आले आहे. त्याचबरोबर आपल्या तोडफोड फलंदाजीसाठी ओळखला जाणारा वैभव सूर्यवंशीचा सुद्धा संघात समावेश करण्यात आला आहे.

टीम इंडियाला समावेश ग्रुप-बी मध्ये स्थान मिळाले असून, या गटात टीम इंडियासमोर यूएई, नेपाळ आणि पाकिस्तान-ए यांचे तगडे आव्हान असणार आहे. टीम इंडिया आपल्या मोहिमेची सुरुवात 20 नोव्हेंबर रोजी नेपाळविरुद्धच्या सामन्याने करेल, तर सर्वांचे लक्ष वेधून घेणारा हिंदुस्थानविरुद्ध पाकिस्तान-ए महामुकाबला 22 नोव्हेंबर रोजी वेस्ट एंड पार्क इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे. यानंतर 24 नोव्हेंबर रोजी यूएईविरुद्ध टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधील अंतिम सामना होईल. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होत असून, दोन्ही ग्रुप्समधून अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. उपांत्य सामने 26 आणि 27 नोव्हेंबरला तर अंतिम सामना 29 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल.

तिलक वर्मा (कर्णधार), रजत पाटीदार (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, प्रभसिमरन सिंह (यष्टीरक्षक), रिंकू सिंह, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), सूर्यांश शेडगे, शाहबाज अहमद, विप्रज निगम, हर्ष दुबे, तनुष कोटियन, हर्षित राणा, प्रिंस यादव आणि अरशद खान.

Comments are closed.