नामेबियाचा धडाकेबाज कारनामा; आयर्लंडला लोळवत केला ऐतिहासिक पराक्रम, पहिल्यांदाच केली अशी कामगिरी
क्रिकेटप्रेमी ज्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत, ती स्पर्धा म्हणजे 2027 चा वनडे वर्ल्डकप. हा वर्ल्ड कप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामेबिया या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वेच्या तुलनेत नामेबिया देश नवखाच. मात्र, त्यांनी सध्या जो पराक्रमक करून दाखवला आहे, तो दिग्गज संघांना विचार करायला लावणार आहे.
नुकतीच झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यामध्ये पाच सामन्यांची वनडे मालिका पार पडली. विशेष म्हणजे ही मालिका नामेबियाने 3-2 अशा फरकाने जिंकत इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या इतिहासात नामेबियाने कोणत्याही पूर्ण सदस्य देशाविरुद्ध वनडे मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. सामन्याचा विचार करता प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडचा संघ 44 षटकांत केवळ 129 धावांवर ऑलआउट झाला. प्रत्युत्तरात, नामेबियाने 21.2 षटकांत 5 गडी राखून लक्ष्य गाठले. मालिका विजयात कर्णधार जेरहार्ड इरासमस (263 धावा) आणि अष्टपैलू जेडब्ल्यू स्मिट (10 विकेट्स) यांनी मोलाचे योगदान दिले.
आगामी 2027 मधील वनडे विश्वचषक दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामेबिया संयुक्तपणे आयोजित करणार आहेत. सह-यजमान असला तरी नामेबियाला विश्वचषकासाठी पात्रता फेरी खेळावी लागणार आहे. अशात आयर्लंडविरुद्धचा हा ऐतिहासिक विजय आगामी विश्वचषकाच्या दृष्टीने नामेबियाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे.
Comments are closed.