प्रदीप पूर्णेकर हत्येच्या निषेधार्थ ठाण्यात सर्वपक्षीयांचा कँडल मार्च

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेनेचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या निषेधार्थ समस्त ठाणेकरांची एकजूट आज पुन्हा दिसून आली. पूर्णेकर कुटुंबाला न्याय मिळवून द्या या मागणीसाठी आज रात्री शहरात सर्वपक्षीयांनी कँडल मार्च काढला. पोलीस प्रशासनाला जाग येणार का.. आरोपींना शिक्षा मिळणार का, असा सवाल कँडल मार्चमध्ये सहभागी झालेल्या ठाणेकरांनी केला.

या मोर्चात शिवसेना नेते व माजी खासदार राजन विचारे, प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर, मुलगा राम पूर्णेकर, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर, उपजिल्हाप्रमुख सुनील पाटील, अॅड. रोहिदास मुंडे, शहरप्रमुख अनिश गाढवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, धर्मराज्य पक्षाचे राजन राजे, नगरसेवक शहाजी खुस्पे, माजी नगरसेवक संजय तरे, उपशहरप्रमुख सचिन चव्हाण, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण, मनसेच्या समीक्षा मार्कंडे यांच्यासह हजारो ठाणेकर सहभागी झाले होते.

पूर्णेकरांच्या हत्येचा इव्हेंट सुरू, मीनाक्षी शिंदे यांचे संतापजनक वक्तव्य

पूर्णेकर हत्याकांडात सप्लीमेंटरी एफआयआरमध्ये नाव असलेल्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी पूर्णेकरांच्या हत्येचे सूतक संपले असून आता इव्हेंट सुरू असल्याचे अत्यंत असंवेदनशील वक्तव्य पत्रकार परिषदेत बोलताना केले. कुठे मोर्चे काढले जातात, कुठे कँडल मार्च काढतात असे शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सर्व स्तरांतून संताप व्यक्त केला आहे.

Comments are closed.